तेलंगण मुख्यमंत्री जाहिरात बातमी

तेलंगण मुख्यमंत्री जाहिरात बातमी

सूचना - जाहिरात विभागाकडून आलेली ही बातमी सर्व आवृत्‍त्यांसाठी आवश्यक आहे.
............
फोटो येणार आहे.......
ओळ
करीमनगर (तेलंगण) ः शेतकऱ्यांशी संवाद साधताना तेलंगणचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव.

तेलंगणमध्ये शेतकऱ्यांसाठी
२२८ कोटी रुपयांचे पॅकेज
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची घोषणा
करीमनगर, ता. २४ ः तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गारपिटीमुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी २२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्या अंतर्गत गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा प्रकार कोणताही असला, तरी प्रती एकर दहा हजार रुपयांचे साह्य मिळणार आहे.
खम्माम, महाबुबाबाद, वारंगल, करीमनगर आदी ठिकाणी गारपिटीमुळे फटका बसलेल्या भागांचा आढावा केल्यानंतर राव यांनी मदतीची घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे दोन लाख २२ हजार २५० एकरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. मका, आंबा, भात आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकार मदतीला येणार नसले, तरी राज्य सरकार लगेच पुनर्वसन करेल.’’
तेलंगण राज्याने कृषी क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा उल्लेख करून, राज्य सरकारने अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावल्याचे नमूद केले. दरडोई उत्पन्नात तेलंगण अग्रभागी असल्याचे त्यांनी सांगितले. महाबुबाबाद जिल्ह्यातील रेड्डीकुंटा, वारंगल जिल्ह्यातील नरसंपेत, रामाडुगू भागातील लक्ष्मीपूर गाव आदी ठिकाणची त्यांनी पाहणी केली. कृषिमंत्री निरंजन रेड्डी, मंत्री एराबेल्ली दयाकर राव, सत्यवती राठोड, रायतू बंधू समितीचे अध्यक्ष पल्ला राजेश्वर रेड्डी आणि त्या भगातील आमदार त्यांच्यासमवेत होते.

फोटो ओळ
शेतकऱ्यांशी संवाद साधताना तेलंगणचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com