बारसूविरोधी आंदोलनाला ‘दक्षिणायन’चा पाठिंबा

बारसूविरोधी आंदोलनाला ‘दक्षिणायन’चा पाठिंबा

बारसूविरोधी आंदोलनाला
‘दक्षिणायन’चा पाठिंबा

पुणे, ता. २६ ः कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक जनतेने उभ्या केलेल्या आंदोलनाला ‘दक्षिणायन’ चळवळीने पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक-कवी, पत्रकार व कलाकारांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये महेश एलकुंचवार, डॉ. रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, प्रज्ञा दया पवार, छाया दातार आदी सुमारे ४० ज्येष्ठ लेखक-कवी-नाटककारांचा समावेश आहे.
दक्षिणायन महाराष्ट्राचे निमंत्रक संदेश भंडारे आणि प्रमोद मुनघाटे यांनी याबाबतचे पत्रक जाहीर केले आहे. ‘कोकण हा पृथ्वीवरील, औद्योगिकीकरणाच्या कचाट्यातून अजूनही बऱ्याच प्रमाणात वाचलेला, जैविक विविधतेने मानवी अस्तित्वासाठी आवश्यक अशा पर्यावरणाचा ठेवा आहे. म्हणून तेथील सर्वसामान्य लोकांनी आजवर येऊ घातलेल्या प्रदूषणकारी प्रकल्पाला प्राण पणाला लावून विरोध केला आहे. या प्रकल्पाचे समर्थन तथाकथित विकासाचे कारण दाखवून केले जात आहे. परंतु, साम्राज्यवादी शक्तींचा यामागील स्वार्थी व विनाशकारी हेतू ग्रामस्थांना समजावून सांगण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी नेटाने आंदोलन चालविले आहे. या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे’, असे या पत्रकात म्हटले आहे.

प्रकल्प रद्द व्हायला हवा
ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. हा विरोध घटनात्मक पद्धतीने स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांमध्ये रीतसर ठराव मंजूर करून व ते सरकारला सर्व स्तरावर देऊन व्यक्त झाला आहे. या प्रकल्पामुळे फक्त कोकणातील काही गावे बाधित नाहीत, तर मानवजात व जीवसृष्टी बाधित आहे. रिफायनरी प्रकल्प हा मानवजात व जीवनाशी द्रोह ठरेल, हत्येचा गुन्हा ठरेल. बारसू येथील रिफायनरी प्रकल्प तत्काळ रद्द व्हायला हवा, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com