‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरसीसी-एसईटी’साठी 
रविवारी स्कॉलरशिप परीक्षा
‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा

‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा

sakal_logo
By

‘आरसीसी-एसईटी’साठी
रविवारी स्कॉलरशिप परीक्षा
पुणे, ता. २७ : प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसच्या वतीने ‘नीट’ या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी ‘रिपीटर बॅच’ एक जूनपासून सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने ‘आरसीसी-एसईटी स्कॉलरशिप’ परीक्षा रविवारी (ता. २८) आयोजित केली आहे. या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के मोफत प्रवेशाची संधी मिळेल, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.
प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या ‘आरसीसी’तर्फे लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला, पुणे (पिंपरी), पुणे (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) शाखेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. ‘आरसीसी-एसईटी स्कॉलरशिप’परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘www.rccpattern.com’ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. स्कॉलरशिप परीक्षेची वेळ आणि ठिकाण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. लवकरात लवकर ‘आरसीसी-एसईटी’ स्कॉलरशिप परीक्षेसाठी नोंदणी करावी, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. दरम्यान ‘नीट-२०२३’च्या परीक्षेत ४०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच असेल, अशीही माहिती त्यांनी दिली.