संजीवनमध. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीवनमध.
संजीवनमध.

संजीवनमध.

sakal_logo
By

संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात
आज नॅशनल लेव्हल टेक्निकल फेस्ट

पन्हाळा, ता. ५ ः विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांच्यातील संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील परिक्रमा उपक्रम (नॅशनल लेव्हल टेक्निकल फेस्ट २०२२) शुक्रवारी (ता. ६) आयोजित केल्याची माहिती संस्थापक पी. आर. भोसले, प्राचार्य मोहन वनरोट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. मध्यंतरी दोन वर्षे कोरोनामुळे हा उपक्रम घेता आला नाही. त्यामुळे यावर्षी हा उपक्रम ९ वेगवेगळ्या प्रकारात घेतला जाणार असून, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील साधारण दोन हजार विद्यार्थी यात सहभागी होतील. सी कॅडिगो, प्रोजेक्ट कॉंपिटिशन, पोस्टर प्रेझेंटेशन, बॅटल ग्राउंडस्‌ मोबाईल इंडिया, पेस ऑनलाईन फूटबॉल टुर्नामेंट, शार्क टॅंक प्रोजेक्ट, ब्रेन टेस्टर, फिल्ड मास्टर, बॉक्स क्रिकेट आदी प्रकारात हा उपक्रम होणार आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील ६० महाविद्यालयांतील विद्यार्थी यात सहभागी होणार असून, विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. एकूण एक लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रवेश शुल्क नाममात्र आहे. सहभागी विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकापासून मोफत बस सेवा दिली जाणार आहे. संजीवनने ज्ञानार्जनाबरोबरच असे विविध उपक्रम राबवल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रसिद्ध कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध झाल्याची माहिती संस्थेचे सचिव एन. आर. भोसले यांनी दिली. यावेळी प्रा. आर. एस. नेजकर, प्रा. देवकर, संग्राम पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b01903 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top