
पान ८
02603
पन्हाळा ः येथील रस्त्याचे उदघाटन करताना सतेज पाटील,आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने.
पन्हाळ्याच्या विकासासाठी भरघोस निधी देवू
पालकमंत्री सतेज पाटील ; ९ महिन्यानंतर मुख्य रस्ता खुला
पन्हाळा, ता. ७ ः पन्हाळ्याच्य विकासासाठी निधी कधीच कमी पडू दिला जाणार नाही, जोतिबा ते पन्हाळा रोप वे बरोबरच मोठा कार्यक्रम भरवा,मोठी स्पर्धा घ्या, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देवू तसेच पन्हाळा आणि जोतिबावर सोलरच्या माध्यमातून पाणी उपसा योजनेसाठी वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. तब्बल ९ महिने बंद असलेला पन्हाळगडाचा मुख्य रस्ता आज सुरू झाल्या त्याच्या उदघाटनप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. आमदार डॉ विनय कोरे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार विनय कोरे यांनी, पन्हाळ्याची रस्तारुपी जीवनवाहिनी सुरू झाल्याने खऱ्या अर्थाने पर्यटन हंगाम सुरू होईल, आणि दोन वर्षे कोरोनामुळे आणि एक वर्ष अतिवृष्टीमुळे बंद पडलेले गडावरील लोकजीवन पूर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अनेक तज्ञांना बोलावून त्यांची मते घेऊन हा नवीन तंत्रज्ञानाचा रस्ता तयार केला असून नजीकच्या काळात हा पर्यटकांसाठी सेल्फीपॉइंट ठरेल असे सांगितले.
खासदार धैर्यशील माने यांनी नवीन तंत्रज्ञान आणि जुने शिवकालीन बांधकाम यांचा चांगला मेळ साधत हे काम झाल्याचे सांगून ऐतिहासिक बांधकामे करताना अशा तंत्रशुद्ध बांधकाम करणाऱ्या एजन्सींना कामे द्यावीत, असे स्पष्ट केले. येत्या २६ तारखेला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून पन्हाळा, शाहुवाडी आणि शिराळा या तालुक्यात कृषि पर्यटनाबरोबर ऐतिहासिक पर्यटन वाढावे, यासाठी आराखडा तयार ठेवण्याचे आदेश प्रशासनासह लोकप्रतिनिधींना दिले.
यावेळी गोकुळचे संचालक करण गायकवाड, बाबासाहेब चौगुले, माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल, जि.प सदस्य शिवाजी मोरे, कंत्राटदार शिवाजी मोहिते, बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता संजय काटकर यांनी स्वागत केले. प्रशासक स्वरूप खारगे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b01908 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..