खरीपासाठी कृषि विभाग सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीपासाठी कृषि विभाग सज्ज
खरीपासाठी कृषि विभाग सज्ज

खरीपासाठी कृषि विभाग सज्ज

sakal_logo
By

खरीपासाठी कृषि विभाग सज्ज

पन्हाळा, ता. १० ः यंदाच्या मृग नक्षत्रात पावसाचे चांगले संकेत मिळत असल्याने तालुक्यातील बळीराजाबरोबरच खरीप हंगामासाठी तालुका कृषी विभाग आणि पंचायत समिती कृषि विभाग नियोजनाला लागला आहे.
तालुक्यात खरीप हंगामासाठी भात ९१७१हेक्टर, ज्वारी ७१०,नागली ३६८, मका ११० आणि आई तृणधान्य असे १०हजार ३७१हेक्टर असून, तूर ६९,मूग १४,उडीद १०२ असे १९१हेक्टर क्षेत्र कडधान्य, तर भुईमूग ३६११, सोयाबीन १७४०, तीळ दोन हेक्टर क्षेत्र तेलबियासाठी आहे. गतवर्षी प्रमुख पिकांमध्ये भात ९४२०, संकरित ज्वारी ७१०, नागली २८०, भुईमूग ३६११तर सोयाऐ १७४१हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले होते. यावर्षीही पेरक्षेत्र १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्याचे कृषी विभागाने ठरवल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर. बी. गायकवाड आणि पंचायत समितीचे अधिकारी एस. व्ही. शिंदे यांनी दिली. या हंगामासाठी भात ३०६० क्विंटल, सोयाबीन ३९०, भुईमूग १४५ खरीप ज्वारी ५४क्विंटल बियाणांची मागणी निश्चित केली असून, पन्हाळा गटास युरिया ४८७४मे.टन, डीएपी १७२४, सुपर फॉस्फेट १११९, पोटॅश १६१४, संयुक्त खाते ४२६८ टन असे एकूण १३५९९ टन मिळणार आहे.

चौकट
अधिकाऱ्यांचे आवाहन
तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना गुणवत्ता पूर्ण तसेच मान्यता प्राप्त अधिकृत उत्पादकांची निविष्ठा विक्री करणे, खत विक्री इ पॉस मशिनद्वारे करणे, योग्य दरात विक्री करणे, विहित नमुन्यात नोंदी ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे व खते विकत घ्यावी, पक्के बील घ्यावे, बीजप्रक्रिया करून पेरणी करावी असे आवाहन ही कृषी अधिकाऱ्यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b01912 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top