
चव्हाणवाडीत हाणामारी तीन महिला जखमी परस्पर विरोधी तक्रारी दाखल
यात्रेच्या वर्गणीवरून
चव्हाणवाडीत ठिणगी
तीन महिला जखमी; एकमेकांच्या घरात घुसून नासधूस
आपटी, ता. ११ ः पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी येथे यात्रेच्या वर्गणीवरून दोन गटात हाणामारी झाली. मारामारीत दोन्ही गटांनी एकमेकांच्या घरात घुसून तोडफोड व मारहाण केल्याने दोन घरांतील साहित्यासह किराणा दुकानाचे मिळून ५१ हजारांचे नुकसान झाले आहे. शुभांगी शिवाजी चव्हाण (वय २८), श्वेता धनाजी चव्हाण (३०), आक्काताई बुवा या जखमी झाल्या. दोन्ही गटांनी पन्हाळा पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दिली. पंधरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाणवाडी येथील ग्रामदैवताची यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. ऑर्केस्ट्रा चालू असताना दोन गटातील युवक एकमेकांना भिडले; पण हा वाद तात्पुरता मिटला. दुसऱ्या दिवशी वादाचे रूपांतर भांडणात झाले. दरम्यान, दोन्ही गटांनी एकमेकांच्या घरात घुसून तोडफोड व मारहाण केल्याने किराणा दुकानाचे मिळून ५१ हजारांचे नुकसान झाले आहे. तीन महिला जखमी झाल्या.
पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. हाणामारीप्रकरणी प्रसाद कृष्णात बुवा, शरद तानाजी बुवा, रोहन तानाजी बुवा, नवनाथ रामचंद्र बुवा, राहुल काशीनाथ बुवा, राहुल मारुती बुवा, अमोल बुवा, रोहित कृष्णात बुवा, विनायक कृष्णात बुवा व महादेव कृष्णात बुवा यांच्यासह शिवाजी सर्जेराव चव्हाण, धनाजी सर्जेराव चव्हाण, आनंदा बजरंग चव्हाण, योगेश सखाराम चव्हाण व रोहित चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गावंडे, हेडकॉन्स्टेबल ढमाळे व नाईक पाटील करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b01915 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..