भरधाव गाडीने मोटरसायकलला उडवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरधाव गाडीने मोटरसायकलला उडवले
भरधाव गाडीने मोटरसायकलला उडवले

भरधाव गाडीने मोटरसायकलला उडवले

sakal_logo
By

मोटारीच्या धडकेत
मायलेकी जखमी
पन्हाळा, ता. १७ ः आज दुपारी पन्हाळगडावरील रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी मोटार (टीएस १२ इआर २४४२) ने भारती अंकुश बडदे यांच्या मोपोड (एमएच ०९ डीटी ८८५४) ला जोरदार धडक दिली. यात भारती आणि त्यांची मुलगी स्वरा जखमी झाल्या यांची नोंद पन्हाळा पोलिसांत झाली आहे.
हैद्राबाद येथील जायेद खाजामोईद्दिन मोईन (वय २३) हे मोटार भरधाव चालवत पन्हाळगडी येत होता. आज पन्हाळा विशाळगड मोहिमेसाठी आलेल्या धारकऱ्यांची गर्दी होती. धारकऱ्यांच्या अंगावर गाडी जाता जाता वाचली आणि बडदे यांच्या मोपेडला धडकली. मोटारसायकलवरील महिला पडताच उपस्थित लोकांनी मोटारचालकाला मारहाण करून मोटारीचेही नुकसान केले. पोलिस निरीक्षक अरविंद काळे आणि त्यांच्या चालकाने मोटारचालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून घेत पोलिस ठाण्यात आणले. याबाबतची फिर्याद हवालदार प्रकाश डमाळे यांनी पोलिसांत दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b01923 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top