
पन्हाळा..सहा ऐवजी सात जि.प.गट
पन्हाळा तालुका
जिल्हा परिषदेचे सहाऐवजी सात गट
वाडीरत्नागिरी स्वतंत्र जिल्हा परिषद गट
पन्हाळा, ता. २ ः पन्हाळा तालुक्यात पूर्वी सातवे, कोडोली, पोर्ले तर्फ ठाणे, कोतोली, यवलूज आणि कळे असे सहा जिल्हा परिषद गट होते. यावेळी पंचायत समिती गणांची तसेच गावांची अदलाबदल करत जिल्हा परिषदेचे सहाऐवजी सात गट आणि पंचायत समितीचे बाराऐवजी चौदा गण झाले आहेत. यावेळी पोर्ले तर्फ ठाणे गटात असणारा वाडीरत्नागिरी गणाचा स्वतंत्र जिल्हा परिषद गट केला असून, त्यात वाडीरत्नागिरी आणि बोरिवडे गणाचा समावेश केला आहे. बोरिवडे हा वेगळा गण निर्माण करण्यात आला आहे, तसेच कोतोली गटात असणारा बाजारभोगाव गण कमी करून तो पुनाळ या नव्या गटात समाविष्ट केला आहे. पोर्ले तर्फ ठाणे गटात पोर्ले, यवलूज आणि वाघवे अशा तीन गणांचा समावेश केला आहे. वाडीरत्नागिरी गणात गिरोली, दाणेवाडी, पोहाळे तर्फ ठाणे, केखले, जाखले आणि कुशिरे ही गावे असून, बोरिवडे गणात आंबवडे, बुधवारपेठ, नेबापूर, आपटी, जेऊर, म्हाळुंगे, बादेवाडी, बोंगेवाडी, वेखंड वाडी, नावली, मिठारवाडी, जाफळे, बोरिवडे आणि पैजारवाडी या बांदारी परिसरातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.
पॉईंटर
*कोतोली हा गट आणि गण एकच
*पोर्ले गटात दोनऐवजी तीन गण
*यवलूज गट कमी
*सातवे, कोडोली कळे गट आणि गणात बदल नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b01943 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..