
पन्हाळ्यात कृषिदिन उत्साहात
पन्हाळा पंचायत समितीतर्फे कृषि दिन
पन्हाळा ता.३ ः पन्हाळा पंचायत समिती आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आज कृषि दिन झाला. याचे औचित्य साधून सेंद्रीय शेतीतून सेंद्रीय उत्पादन घेवून सेंद्रीय उत्पादनाची निर्मीती विक्री स्वबळावर करणाऱ्या तसेच आरोग्यदायी जीवन व विषमुक्त शेती याबाबतची जाणीव जागृती आणि प्रयत्न या उल्लेखनीय कार्यानिमीत्त पन्हाळा तालुक्यातील ११ ( अकरा ) शेतकऱ्यांचा सत्कार पंचायत समिती मार्फत करण्यात आला
या कार्यक्रमावेळी पन्हाळा तालुक्यातील सेंद्रीय शेती करणारे, रघुनाथ चौगुले - माले , सर्जेराव पाटील - किसरूळ , दिलीप जमदाडे - माले, आनंदा पाटील पोखले , उत्तम पाटील - कोतोली, ॠषिकेश पाटील म्हाळुगे /बोरगाव, गितांजली गुरवळ - खोतवाडी , जयवंत मगदुम केखले , समाधान पाटील कोडोली , मिलींद पाटील - पिसात्री यांचा सन्मानपत्र देवून सत्कार करणत आला. उपविभागीय कृषि अधिकारी मकरंद कुलकर्णी , गट विकास अधिकारी सुभाष सावंत , तालुका कृषि अधिकारी बी आर चव्हाण , कृषि अधिकारी सतिश जाधव , विस्तार अधिकारी संजय देसाई , शिवाजीराव कोळी , तांत्रिक अधिकारी सुदर्शन पाटील, सी. बी पाटील उपस्थित होते. आभार अविनाश मेश्राम यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b01968 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..