टुडे ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४
टुडे ४

टुडे ४

sakal_logo
By

पन्हाळा किल्ला, शिवा काशीद
समाधिस्थळाला निधीची मागणी
पन्हाळा : पन्हाळा किल्ल्याची आणि नरवीर शिवा काशीद समाधिस्थळांची दुरवस्था झाली असून शासनाने यांची गंभीर दखल घेऊन संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, पुरातत्त्‍व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणाची व गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी पन्हाळा प्रांतांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पन्हाळा गडकोट किल्ल्याची तटबंदी व बुरुज, तसेच ऐतिहासिक इमारती ढासळल्या आहेत, काही इमारतींना तडे गेले आहेत. पुरातत्त्‍व विभागाच्या बेजबाबदार व उदासीन धोरणामुळे किल्ल्याचे अस्तित्व संपून जाऊ लागले आहे, छत्रपती शिवरायांच्या व निष्ठावंत मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष असणाऱ्या किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. किल्ल्याचे सर्वेक्षण करून केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून घ्यावा. तसेच नेबापूर येथील वीर शिवा काशीद समाधी परिसराचे जतन व संवर्धन करावे, अशी मागणी केली असून या मागणीची दखल न घेतल्यास कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b01975 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..