टुडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २
टुडे २

टुडे २

sakal_logo
By

पन्हाळा नगरपरिषदेत
पाचपैकी तीन ओबीसी महिलांना संधी


पन्हाळा, ता. २८ ः येथील गिरिस्थान नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढली. यात पन्हाळा नगरपरिषदेत सध्या १७ ऐवजी २० नगरसेवक झाले असून त्यात १० महिला, आणि १० नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. १० महिला नगरसेविकांपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५ महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी ३ महिला, आणि अनुसूचित जातीसाठी २ महिला निवडल्या जाणार आहेत.
आज नागरिकांचा मागासवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढली. नागरिकांच्या मागासासाठी ५ जागा असून त्यापैकी ३ महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यात प्रभाग ५ अ, ६ अ आणि १० अ या जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. यात बऱ्याच इच्छुकांचे मनसुबे उधळल्याने त्यांना पत्नीच्या जातीच्या दाखल्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अमित माळी होते. नगरपरिषदेची आरक्षण सोडत यापूर्वीच जाहीर झाली आहे. त्यात प्रभाग १, ७ आणि ८ मधील प्रत्येकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली होती. तथापि, त्यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग जाहीर न झाल्याने ही सुधारित आरक्षण सोडत आज काढली.

प्रभागनिहाय आरक्षण असे -
*प्रभाग १ अ- अनुसूचित जाती महिला, * प्रभाग १ ब -सर्वसाधारण,* प्रभाग २ अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग, *प्रभाग २ ब-सर्वसाधारण महिला *प्रभाग ३ अ - नागरिकांचा मागास * प्रवर्ग- ३ ब - सर्वसाधारण महिला *प्रभाग ४ अ- सर्वसाधारण महिला, *प्रभाग ४ ब- सर्वसाधारण, *प्रभाग ५अ- नागरिकांचा मागास महिला *प्रभाग ५ ब -सर्वसाधारण, *प्रभाग ६ अ- नागरिकांचा मागास महिला *प्रभाग ६ ब- सर्वसाधारण, *प्रभाग ७ अ - अनुसूचित जाती, *प्रभाग ७ ब- सर्वसाधारण महिला, *प्रभाग ८अ -अनुसूचित महिला *प्रभाग ८ब- सर्वसाधारण, *प्रभाग ९ अ- सर्वसाधारण महिला, *प्रभाग ९ब-सर्वसाधारण, *प्रभाग १० अ- नागरिकांचा मागास महिला *प्रभाग १० ब- सर्वसाधारण. मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी स्वागत केले. अभियंता अंशूमन गायकवाड, अमित माने, यांनी निवडणूक कामी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b02004 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top