पन्हाळा पंचायत समितीच्या १४ जागांचे आरक्षण जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्हाळा पंचायत समितीच्या १४ जागांचे आरक्षण जाहीर
पन्हाळा पंचायत समितीच्या १४ जागांचे आरक्षण जाहीर

पन्हाळा पंचायत समितीच्या १४ जागांचे आरक्षण जाहीर

sakal_logo
By

पन्हाळा

कोडोली गटात महिला;
सातवे गटात सर्वसाधारण खुले
आपटी ः राज्य निवडणूक विभागाने अधिसूचित केलेल्या आरक्षणानुसार २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी पन्हाळा पंचायत समितीच्या १४ जागांची आरक्षण सोडत मयूर उद्यानातील नगरपरिषद हॉलमध्ये सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्या उपस्थितीत तहसीलदार रमेश शेंडगे यांनी जाहीर केली. श्रद्धा सावंत व श्रेयश आंबेकर या मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. १४ जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २ जागा, त्यामध्ये १ जागा स्त्रियांसाठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३ जागा असून त्यामध्ये २ स्त्रियांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या ९ जागांपैकी त्यामध्ये ४ स्त्रियांसाठी राखीव आहेत. कोडोली गटातील दोन्ही जागा महिलांसाठी राखीव, तर सातवे गटातील दोन्ही जागा सर्वसाधारण खुल्या राहिल्या आहेत. आरक्षणामुळे काही ठिकाणी निराशा आहे, तर काही ठिकाणी इच्छुकांची गर्दी होणार आहे. यावेळी नायब तहसीलदार विनय कौलवकर, महसूल कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


गणनिहाय आरक्षण-
सातवे, माले, बोरिवडे, बाजारभोगाव, वेतवडे ः सर्वसाधारण.
कोडोली पूर्व ः अनुसूचित जाती स्त्री राखीव.
कोडोली पश्चिम ः सर्वसाधारण स्त्री राखीव.
वाडीरत्नागिरी ः अनुसूचित जाती.
पोर्ले तर्फ ठाणे ः नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव.
वाघवे ः नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव.
यवलूज ः नागरिकांचा मागास प्रवर्ग.

कळे, पुनाळ, कोतोली ः सर्वसाधारण स्त्री राखीव.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b02005 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..