नाही तर हागणदारी आंदोलन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाही तर हागणदारी आंदोलन...
नाही तर हागणदारी आंदोलन...

नाही तर हागणदारी आंदोलन...

sakal_logo
By

हागणदारी आंदोलन
छेडण्याचा इशारा
पन्हाळा, ता.२ ः सध्या सर्वत्र हागणदारी मुक्त गाव, निर्मल ग्राम,तालुका, जिल्हा योजना सुरू आहे. त्यासाठी शासनाबरोबर गाव,वाड्या वस्त्यानी पुढाकार घेतला असून शासनाने गोरगरीब कुटुंबांना शौचालयासाठी अनुदान देण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे.अनुदान मिळणार म्हणून काहींनी शौचालये बांधली आहेत,पण गेल्या वर्षभरात त्यांना अनुदान मिळालेले नाही.
ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती प्रशासनाकडून याबाबत योग्य ती माहिती दिली जात नाही, जुजबी उत्तरे दिली जातात. या कारणास्तव दलित महासंघाचे कोल्हापूर जिल्हा संघटक अशोकराव गायकवाड यांनी याबाबत पन्हाळा गटविकास अधिकाऱ्यांना सात दिवसांत माहिती न मिळाल्यास कार्यालयासमोर हागणदारी आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b02060 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..