आसूर्ले झालेल्या भांडणात एक जण जखमी तर एकावर अँक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसूर्ले झालेल्या भांडणात एक जण जखमी तर एकावर अँक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
आसूर्ले झालेल्या भांडणात एक जण जखमी तर एकावर अँक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

आसूर्ले झालेल्या भांडणात एक जण जखमी तर एकावर अँक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

sakal_logo
By

टेंपो रस्त्यात लावल्याने
आसुर्लेत चालकास मारहाण
गावातील एकावर जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा
आपटी, ता. १६ ः आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे रस्त्यावर टेंपो उभा केल्याच्या रागातून राजू दिनकर चावरेकर यांना मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी बाबासाहेब गणपती पाटील यांच्यावर जातिवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी राजू चावरेकर टेंपोचालक आहे. महिलांना कामावर पोहोचवण्यासाठी टेंपो आसुर्ले येथील कमानीजवळ रस्त्यावर उभा केला होता. दरम्यान, बाबासाहेब पाटील याने टेंपो रस्त्यावर उभा केल्याच्या रागातून राजू चावरेकर यास मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. टेंपोमधून प्रवास करणाऱ्या महिला भांडण सोडवण्यास गेल्या. फिर्यादी सुमन हिने बाबासाहेब यास अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाबासाहेबने महिलांनाही जातिवाचक शिवीगाळ केली. मारहाणीत टेंपोचालक राजू चावरेकर जखमी झाला. याबाबत पन्हाळा पोलिसात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व नागरी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी बाबासाहेब याला ताब्यात घेतले असून अधिक तपास शाहूवाडी उपविभागीय अधिकारी रवींद्र साळोखे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b02077 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..