पान ५ स पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५ स पटा
पान ५ स पटा

पान ५ स पटा

sakal_logo
By

50597
कोल्हापूर : ‘नॅब’तर्फे ध्वजनिधी संकलन प्रसंगी उपस्थित मान्यवर.

‘नॅब’तर्फे ध्वजनिधी संकलन
कोल्हापूर : नॅब कोल्हापूरतर्फे ध्वजनिधी संकलनास प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या हस्ते ध्वजनिधी संकलन झाले. विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) अशोक गाडे, सह जिल्हा निबंधक मल्लिकार्जुन माने, राज्य मार्ग परिवहन विभागाचे उत्तम पाटील उपस्थित होते.अध्यक्ष प्रा. डॉ. मुरलीधर डोंगरे यांनी नॅब कोल्हापूर शाखेने ३२ वर्षांत अंध कल्याण आणि पुनर्वसनसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. ‘नॅब’तर्फे दोन अंध जोडपे सुनील व कौसल्या दोडमणी, दत्तात्रय व दिपाली वडर यांना विवाहभेट म्हणून धनादेश, संसारोपयोगी साहित्य दिले.
सचिव विजय रेळेकर यांनी आभार मानले. ‘नॅब’चे उपाध्यक्ष बाळ पाटणकर, अॅड. उदय शिरगोपीकर, रवी संघवी, डॉ. मीना डोंगरे, शिवानंद पिसे, सुनील नागराळे, केरबा हांडे आदी उपस्थित होते.

03084
विश्वास चौगले

पनोरी उपसरपंचपदी विश्वास चौगले
सोळांकूर : पनोरी (ता. राधानगरी) उपसरपंचपदी विश्वास दामोदर चौगले यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच तुकाराम परीट उपस्थित होते.
मावळते उपसरपंच स्वप्नील पातले, सदस्य शशिकांत कांबळे, आक्काताई चौगले, संगीता बरगे, सुरेखा बरगे, संजीवनी सूर्यवंशी, सुवर्णा परीट उपस्थित होते.
रणजित चौगले, नंदकिशोर सूर्यवंशी, भिकाजीराव एकल, भगवानराव पातले व सुकाणू कमिटीचे अध्यक्ष वसंतराव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामसेवक सुनील निकम यांनी आभार मानले.


साधोबा तलावाच्या दुरुस्तीची मागणी
पन्हाळा ः येथील साधोबा तलाव चारही बाजूने कमकुवत झाला असून या तलावाच्या भिंती कोसळत आहेत. मंगळवारी या तलावाच्या दक्षिण बाजूची मोटवान कोसळली असून या भिंतीस फुगवटा आला आहे. तलावात महिला धुणे धुण्यास जात असल्याने धोका निर्माण झाला आहे. तरी या तलावाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्यासह आमदार डॉ. विनय कोरे यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, या तलावाचा गाळ बऱ्याच वर्षांत काढलेला नाही, तलावाच्या चारही बाजूच्या भिंती पडायला झाल्या आहेत. त्या दुरुस्त कराव्यात तसेच प्रवेशद्वारात ऐतिहासिक कमान उभी करून परिसराचा विकास करावा. या निवेदनावर नियाज मुल्ला, जमीर गारदी, मुनाफ मुजावर आदींच्या सह्या आहेत.


00287
वेखंडवाडी ः येथे झाडांचे वाटप करताना उत्तम कंदूरकर.

उत्तरकार्याला हापूस रोपांचे वाटप
देवाळे ः वेखंडवाडी (ता.पन्हाळा) येथील उत्तम कंदूरकर यांनी आज्जी तारूबाई बापू खोत यांच्या निधनानंतर उत्तरकार्यादिवशी पारंपरिक पद्धतीला फाटा देत पर्यावरणपूरक संदेश देत आलेल्या पै-पाहुणे, मित्रमंडळी यांना जातिवंत हापूस आंब्याच्या साडेतीनशे रोपांचे वाटप केले. आजही ग्रामीण भागात उत्तर कार्यादिवशी विविध प्रकारच्या वस्तू वाटप करण्याची पद्धत आहे. आदर्श गाव म्हणून शासनाचे अनेक पुरस्कार मिळवलेल्या वेखंडवाडी येथे त्यांनी लोकसहभागातून गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. गावात''लेकीचे झाड''हा उपक्रम राबवला आहे. लोकांना आंब्याच्या रोपांचे वाटप करून कंदुरकर कुटुंबीयांनी पर्यावरणाप्रती बांधिलकी जपली आहे.

01664
नानीबाई चिखली ः येथे गोकुळतर्फे जनावरांना लसीकरण मोहिमेची सुरवात करताना नविद मुश्रीफ. शेजारी संचालक प्रवीण भोसले, सरपंच छाया चव्हाण.

नानीबाई चिखलीत जनावरांचे लसीकरण
नानीबाई चिखली ः जिल्ह्यात नऊ लाख पशुधन असून या पशुधनाचे लम्पी त्वचारोगापासून संरक्षण करण्यासाठी ‘गोकुळ‘ने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शेतकरी बांधवांनी लक्षण आढळताच गोकुळच्या पशुवैद्यकीय सेवेचा लाभ घेऊन पशुधन सुरक्षित करावे,असे आवाहन गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांनी केले.
गोकुळतर्फे लम्पी त्वचारोग लसीकरण मोहिमेची सुरवात नानीबाई चिखली (ता.कागल) येथून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, सरपंच छाया चव्हाण, उपसरपंच विजय घस्ती, अण्णासाहेब वडगुले, अल्लाबक्ष सय्यद, उत्तम पाटील, डॉ. म्हातुगडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b02082 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..