पान ६ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ६
पान ६

पान ६

sakal_logo
By

ऐन नवरात्रात पन्हाळ्यात
पाण्याचा ठणठणाट

आपटी, ता. १ ः पन्हाळगडावर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच पाणीपुरवठा बंद आहे. ऐन नवरात्रात पन्हाळावासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी केलेल्या दुर्लक्षाचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. पूर्वी जीवन प्राधिकरण पन्हाळ्यावरील पाणीपुरवठा योजना चालवत होती. दोन ते तीन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजना पन्हाळा नगरपरिषदेकडे हस्तांतरित केली. त्यावेळी पन्हाळा नगरपरिषदेने पन्हाळगडावर नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उत्रेतून नवीन पाणी योजना चालू केली. दोन ते तीन वर्षांपूर्वी नवीन पाणीपुरवठा योजना चालू करताना दोन टप्पे केले आहेत.
एक मोटर बंद पडली तर ती दुरुस्त होईपर्यंत दुसऱ्या मोटरीने पाणीपुरवठा करता यावा, या हेतुने दोन्ही ठिकाणी शंभर एचपीच्या दोन दोन मोटरी बसविल्या आहेत; पण पटाचीवाडी येथील टप्प्यावरील दोन मोटरीपैकी एक मोटर तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. त्याची दुरुस्ती केलेली नाही. आठ दिवसांपूर्वी देखभालीअभावी येथील दुसरीही मोटर बंद पडली. त्यामुळे पन्हाळ्यावरील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. रविवारी बंद पडलेली मोटर दुरुस्तीला देण्यासाठी गुरुवार उजाडला.
सणाचे दिवस व नागरिकांचा संताप लक्षात घेऊन दोन दिवसांपूर्वी दोन टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरपरिषदेने चालू केला आहे.