संजीवन मध्ये वाचन प्रेरणा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीवन मध्ये वाचन प्रेरणा दिन
संजीवन मध्ये वाचन प्रेरणा दिन

संजीवन मध्ये वाचन प्रेरणा दिन

sakal_logo
By

संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालय
पन्हाळा : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ग्रंथालय विभागात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिनी होणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात झाला. प्राचार्य डॉ. संजीव एन. जैन यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. पुस्तकांचे व वाचनाचे महत्व ग्रंथपाल सौ. व्ही. एन. भोसले यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, डॉ. कलाम नेहमी म्हणायचे की, एक चांगले पुस्तक हे शंभर मित्रांसारखे असते. त्यामुळे मुलांनी पुस्तके त्याचप्रमाणे इतर साहित्य देखील शक्य आहे तितके वाचावे.’ कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. सुहास सपाटे, रजिस्टार बाळासाहेब कुंभार, विभागप्रमुख प्रा. सरदार देशमुख, प्रा. जब्बार मेवेकरी, प्रा. राहुल नेजकर, सहाय्यक ग्रंथपाल संग्राम पाटील, अभिजित लंबे, उमेश तोडकर, नागेश कर्णिक व सरदार शिंदे उपस्थित होते. संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.