तो येतोय धावूनच...... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तो येतोय धावूनच......
तो येतोय धावूनच......

तो येतोय धावूनच......

sakal_logo
By

बळीराजाला
पावसाची धास्ती

पन्हाळा, ता.१८ ः त्याला वेळ नाही..काळ नाही..आकाश निरभ्र असले, वातावरण स्वच्छ असले आज काही तो येत नाही असे वाटत असले तरी अचानक आकाशात एखादा दुसरा ढग येतो.. त्याच्या जोडीला अन्य ढग जमा होतात.. मोठ्याने आवाज करायला लागतात...वीजांचा कडकडाट त्यांना साथ देतो आणि धुवॉंधार पावसाला सुरुवात होते.जिथे ढग असतील तिथेच पाऊस कोसळतोय.. ढगफुटी सारखा..पाण्याचे जोरदार प्रवाह वाहू लागतात जे जे समोर येईल त्याला घेऊन... पन्हाळा तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसांपासून असा विचित्र पाऊस पडतोय... त्याला परतीचा पाऊस असे नाव असले तरी त्याने चालवलेले नुकसान पाहता तो परतून येऊ नये अशीच सर्वांची धारणा झाली आहे. आज दुपारी तालुक्यातील उत्रे गावात असाच पाऊस झाला आणि नदीच्या प्रवाहासारखे रस्त्यावरून पाणी वाहू लागले. ठिकठिकाणी वीजा पडल्या, वीज बंद झाली. पन्हाळ्यातही मोठा पाऊस झाला. वीज, फोन बंद पडले आणि कामानिमित्त आलेले पक्षकार निराश होऊन परत गेले. या पावसाची खरी धास्ती बळीराजाने घेतली आहे.