मंगळवार पासून दत्त दलमियाची ऊस वाहतूक रोखणार-शिवाजी माने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवार पासून दत्त दलमियाची ऊस वाहतूक रोखणार-शिवाजी माने
मंगळवार पासून दत्त दलमियाची ऊस वाहतूक रोखणार-शिवाजी माने

मंगळवार पासून दत्त दलमियाची ऊस वाहतूक रोखणार-शिवाजी माने

sakal_logo
By

‘दत्त दालमिया’ची ऊस वाहतूक रोखणार

जय शिवराय किसानसह अन्य संघटनांचा इशारा

आपटी, ता. १४ ः जय शिवराय किसान संघटनेने विविध मागण्यांसाठी गेले आठ दिवस ‘दत्त दालमिया’ समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कायदेशीर व सनदशीर मार्गाचा अवलंब करून आंदोलन सुरू असताना कारखाना प्रशासनाने दखल घेतली नसल्याने मंगळवारपासून ऊस वाहतूक करणारी वाहने रोखणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी आसुर्ले-पोर्ले येथील जाहीर सभेत दिला.
मागील वर्षापेक्षा पहिली उचल कमी दिलेली आहे, ती वाढवून द्यावी, या मागणीसह तोडणी वाहतूक दर वाढवून देऊन शेतकऱ्यांची लूट चालू केली आहे. तसेच कारखान्याने साखर संचालकांकडे गत वर्षाचा हिशेब सादर केलेला नसून हिशेबाप्रमाणे एफआरपीचा फरक मिळावा. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जर प्रशासनाने संघटनांच्या मागणीची पूर्तता केली नाही तर कारखाना गेटवर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून कारखाना बंद पाडू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
जय शिवराय किसान संघटनेच्या या आंदोलनास शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, रघुनाथदादाप्रणित शेतकरी संघटना, आझाद हिंद क्रांती संघटनेने पाठिंबा दिला आहे.