शिक्षकच करतोय शाळेतील मुलींशी असभ्य व लैंगिक वर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकच करतोय शाळेतील मुलींशी असभ्य व लैंगिक वर्तन
शिक्षकच करतोय शाळेतील मुलींशी असभ्य व लैंगिक वर्तन

शिक्षकच करतोय शाळेतील मुलींशी असभ्य व लैंगिक वर्तन

sakal_logo
By

शिक्षकाकडून विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन
---
भीतीने विद्यार्थिनींची शाळेलाच दांडी; पन्हाळा तालुक्यातील धक्कादायक प्रकार
आपटी, ता. १९ ः  पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मुलींनी शाळेला जाण्यास का नकार दिला? याच्या चौकशीत पालकांना सुन्न करणारा धक्कादायक प्रकार उजेडात आला. शिक्षकच शाळेतील मुलींशी असभ्य, लैंगिक वर्तन करीत असल्याचे चव्हाट्यावर आले. याबाबत माहिती मिळताच संभाजी ब्रिगेडने शाळेला भेट देत या शिक्षकाला त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी ः असभ्य, लैंगिक वर्तनाचा आरोप असलेल्या शिक्षक हा ७० टक्के अपंग आहे. त्याच्याकडे शाळेतील चौथीचा वर्ग आहे. वर्गात आल्यावर अभ्यासाचे निमित्त काढून तो विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करीत होता. गुरुजीच्या असभ्य कृतीच्या भीतीने मुलींनी चक्क शाळेकडेच पाठ फिरवली. नियमाने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी अचानक शाळेला का जात नाहीत, याची पालकांनी चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आठवड्यापूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकाराचा पालकांना जबर धक्का बसला. त्यामुळे बदनामीच्या भीतीने अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही. मात्र, याबाबत पालकांनी मुख्याध्यापकांची भेट घेऊन या प्रकाराचा जाब विचारला; तर शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकाबाबत ग्रामस्थांचा उद्रेक झाला. संबंधित ग्रामपंचायतीने या घटनेची त्वरित चौकशी होण्याबाबत पोलिस ठाणे, गटविकास अधिकारी व पंचायत समिती गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या घटनेची माहिती मिळताच संभाजी ब्रिगेडने शाळेला भेट देत या शिक्षकाला त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.