प्रांत कार्यालयासमोर संसार मांडून आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रांत कार्यालयासमोर संसार मांडून आंदोलन
प्रांत कार्यालयासमोर संसार मांडून आंदोलन

प्रांत कार्यालयासमोर संसार मांडून आंदोलन

sakal_logo
By

03031
पन्हाळा ः येथील प्रांत कार्यालयासमोर शासकीय मुलकीपड संघर्ष समितीतर्फे बुधवारी संसार मांडून आंदोलन करण्यात आले.

प्रांत कार्यालयासमोर संसार मांडून आंदोलन
मुलकीपड जमिनीवर अतिक्रमण केलेल्या भूमिहीनांना न्याय देण्याची मागणी

पन्हाळा, ता. २३ ः शासकीय मुलकीपड जमिनीवर अतिक्रमण केलेल्या भूमिहीन लोकांना न्याय मिळावा या मागणीसाठी आजपासून येथील प्रांत कार्यालयासमोर राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलकीपड संघर्ष समितीतर्फे संसार मांडून आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत असे आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन तीन दिवस चालणार असून शासनाने दखल न घेतल्यास समितीचे संस्थापक अध्यक्ष शंकर कांबळे शनिवारी (ता. २६) प्रांत कार्यालयासमोर सरण रचून आत्मदहन करणार असल्याचा इशारा महसूल तसेच पोलिस प्रशासनास दिला आहे.
जिल्ह्यात २३ हजार ३४४ हून अधिक अतिक्रमणधारक असून, तीन पिढ्यांपासून हे लोक तेथे राहत आहेत. कायदा हा माणसांसाठी असून, माणसे कायद्यासाठी नाहीत. प्रशासनाने गरीब लोकांचा विचार करून न्यायालयात ही बाब मांडली असती तर आज गायरान अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्याची वेळ आली नसती.
हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन करू नये असा आदेश दाखवा. आंदोलकांच्या मागण्या मान्य करून भूमिहीन लोकांवर कारवाई करू नका, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात जनसुराज्य महिला अध्यक्षा पूजा कदम, दलित एकता आंदोलन संघटनेचे अशोक गायकवाड, नंदिनी दाभाडे, लता पांढरे, जयसिंग पांढरे, भारती महापुरे, शिवाजी दाभाडे यांनी सहभाग घेतला.