बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणाच्या विरोधात पोर्लेच्या युवकाचा उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणाच्या  विरोधात पोर्लेच्या युवकाचा उपोषणाचा इशारा
बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणाच्या विरोधात पोर्लेच्या युवकाचा उपोषणाचा इशारा

बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणाच्या विरोधात पोर्लेच्या युवकाचा उपोषणाचा इशारा

sakal_logo
By

‘बीएसएनएल’विरोधात उपोषणाचा इशारा
आपटी ः बीएसएनएलच्या कोल्हापूर कार्यालयाकडे चार वर्षांपूर्वी ब्रॅाडबॅंड एजन्सीसाठी ॲानलाईन अर्ज केला होता. अर्ज करून चार वर्षे झाले तरी कंपनीने दखल घेतलेली नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंगावर कागदपत्रे भिरकावत अरेरावीची भाषा वापरत असल्याच्या निषेधार्थ पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील विवेक दिनकर चौगुले यांनी बुधवार (ता. २२) पासून बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, ‘ब्रॅाडबॅंडच्या एजन्सीबाबत पाठपुरावा करताना अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तर येत नव्हती. ॲानलाईन अर्जाची कागदपत्रे दाखवताना संबधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रे अंगावर भिरकावली. दोन महिन्यांपूर्वी उद्यमीअंतर्गत दिलेल्या अर्जाची पोच देतानाही अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कंपनीच्या वेळकाढू धोरणाविरोधात बुधवारी उपोषणाला बसणार आहे.’