जमीन वाटपाच्या वादातून दोन भावांना धारधार शास्त्राने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन वाटपाच्या वादातून दोन भावांना धारधार शास्त्राने मारहाण
जमीन वाटपाच्या वादातून दोन भावांना धारधार शास्त्राने मारहाण

जमीन वाटपाच्या वादातून दोन भावांना धारधार शास्त्राने मारहाण

sakal_logo
By

जमीन वाटपाच्या वादातून
दोघा भावांना मारहाण
आसुर्लेत प्रकार; पाचजणांवर गुन्हा

आपटी ता. १ : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे शेतजमिनीच्या वाटपाच्या कारणावरून विळा व चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत जखमीने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसुर्ले येथील शिवरीचा मळा गटनंबर २१८ या जमिनीत फिर्यादी व त्याचा भाऊ किरण भुजंगराव पाटील काम करत होते. तेव्हा मारुती शंकर पाटील, महादेव शंकर पाटील, भिमराव शंकर पाटील, निखिल महादेव पाटील व सर्जेराव ईश्वरा पाटील सर्व (रा. आसुर्ले ता.पन्हाळा) यांनी जमाव करून जमीन वाटपाचा वाद उकरून काढला. फिर्यादी सुनील भुजंगराव पाटील व भाऊ किरण भुजंगराव पाटील या सख्या भावांना विळ्याने व चाकूने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. याबाबत पाच जणांवर गुन्हा नोंद झाला. घटनेचा तपास पोलीस नाईक जाधवर करीत आहेत.