संजीवन मध्ये 38 विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीवन मध्ये 38 विद्यार्थ्यांची निवड
संजीवन मध्ये 38 विद्यार्थ्यांची निवड

संजीवन मध्ये 38 विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

03223
वालचंद इंडस्ट्रीजतर्फे
‘संजीवन’मध्ये भरती मेळावा

पन्हाळा, ता. १६ ः येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात वालचंद इंडस्ट्रीजतर्फे शिकाऊ अभियंता पदासाठी भरती मेळावा झाला. मेळाव्यात ३८ विद्यार्थ्यांची निवड झाली. वालचंद इंडस्ट्रीजच्या मनुष्यबळ विकास विभागप्रमुख रवी भूषण, प्रबंधक नागेश शहाणे, उपमहाप्रबंधक अमोल बरगे, एरोस्पेस व मिसाईल्सचे उपमहाप्रबंधक आशीष केसकर यांचे स्वागत झाले. अध्यक्षस्थानी संजीवन ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन पी. आर. भोसले होते. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे अधिकारी डॉ. अजय मस्के यांनी दोन दिवस चालणाऱ्या प्रक्रियेची माहिती दिली. नागेश शहाणे यांनी वालचंद इंडस्ट्रीजची माहिती देणारी व्हिडीओ क्लिप दाखवली. उपमहाप्रबंधक अमोल बरगे यांनी वालचंद इंडस्ट्रीजमध्ये अभियंत्याच्या कामगिरीबाबतची माहिती दिली.
यावेळी लेखी परीक्षेत ८६ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी ३८ उमेदवारांची तांत्रिक चाचणी व तोंडी मुलाखत झाली. त्यातून १८ जणांची वैयक्तिक मुलाखतीसाठी निवड झाली. त्यातून शरद इनिस्टट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या चार, शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे दोन, तात्यासाहेब कोरे महाविद्यालयाचे दोन, संजीवन अभियांत्रिकीचा एक, आदर्श विटा येथील एक अशा दहाजणांची अंतिम निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सहसचिव एन. आर. भोसले यांनी अभिनंदन केले. प्रा. सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन केले.