Thur, June 8, 2023

हॉटेलच्या जिन्यावरून पडून प्रशिक्षणार्थी युवकाचा मृत्यू
हॉटेलच्या जिन्यावरून पडून प्रशिक्षणार्थी युवकाचा मृत्यू
Published on : 22 March 2023, 4:41 am
पन्हाळा येथे हॉटेलच्या जिन्यावरून
पडून प्रशिक्षणार्थी युवकाचा मृत्यू
आपटी ः पन्हाळा येथील एका हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित अशोक चौगुले (वय २३, रा. जत, जि. सांगली) हा जिन्यावरून पडून मरण पावल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. रोहित सकाळी प्रशिक्षणासाठी जात असताना जिन्यावरून खाली पडल्याने बेशुद्ध झाला. त्याला पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. त्याच्या डोक्यास जबर मार लागला होता.
...............