Mon, Sept 25, 2023

सोशल मिडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांची जामिनावर मुक्तता
सोशल मिडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांची जामिनावर मुक्तता
Published on : 30 May 2023, 6:54 am
धार्मिक स्थळाची तोडफोड, दोघांची जामिनावर मुक्तता
आपटीः पन्हाळा गडावर काही दिवसांपूर्वी धार्मिक स्थळाची तोडफोड झाली होती. हा प्रकार होण्यापूर्वी धार्मिक स्थळाबाबत सोशल मिडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी अटक केलेल्या गणेश सुभाष पोवार (वय २८, रा.पन्हाळा) व योगेश मल्लिकार्जुन अंधारे (वय ३७, रा.राजीव गांधीनगर जयसिंगपूर) या दोघा संशयितांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपली. पन्हाळा पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने दोघांची जामिनावर मुक्तता केली.