
पोर्ले-कुस्तीची बातमी
01127
आसुर्ले ः येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना माजी आमदार सत्यजित पाटील. शेजारी केडीसीसी बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), पृथ्वीराज सरनोबत व अन्य.
लिंगराज व्हनमानेकडून विजयकुमार चितपट
पोर्ले तर्फे ठाणे, ता. ६ ःआसुर्ले (ता. पन्हाळा) येथे झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत शाहूपुरी तालमीचा मल्ल लिंगराज व्हनमाने याने विजयकुमार (हरियाणा) याला घुटना डावावर चितपट करून विजय मिळविला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत एकनाथ बेंद्रे मुंडे तालीम याने शाहूपुरी तालमीचा मल्ल निखील थोरात याच्यावर विजय मिळविला.
बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने खासबाग कुस्ती मैदानाच्या प्रतिकृतीचे बांधकाम सुरू असलेल्या मैदानात मैदान झाले. आखाडा पूजन सरपंच भगवानराव पाटील, उपसरपंच संभाजी पाटील यांच्या हस्ते झाले. मैदानात लहान-मोठ्या सव्वाशेवर कुस्त्या झाल्या. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत ओमकार पाटील (कुंभी कासारी) याने अक्षय साळवी (राक्षी) याच्यावर गुणाने विजय मिळविला. तसेच चार व पाच क्रमांकाच्या कुस्तीत आसुर्ले गावातील मल्ल प्रतीक पाटील व निखील पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यी मल्लांवर विजय मिळविला, तर पोर्लेचा राष्ट्रीय विजेता मल्ल अतुल चेचर याने अनिल झगडे याला चितपट करून विजय मिळवला.
माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, केडीसीसी बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), पोलिस निरीक्षक पन्हाळा अरविंद काळे, दत्त दालमिया कारखान्याचे युनिट हेड एस. रंगाप्रसाद, पन्हाळा पंचायत समिती माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, गटविकास अधिकारी तुळसीदास पाटील यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. पंच म्हणून गजानन परीट, आनंदा मोरे, सर्जेराव पाटील, राजू धनगर, नामदेव पाडेकर, राजाराम पाटील आमशी, हिंदुराव पाटील यांनी काम पाहिले. सर्व ग्रामपंचायत सदस्य, संतोष धुमाळ, दाजी पाटील, के. डी. शेलार, नंदू ढोले उपस्थित होते. कृष्णात जमदाडे पोर्ले यांनी निवेदन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Por22b01377 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..