
स पटा
01708
आंबा ः येथील रताळी मुंबईच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत.
शाहूवाडीची रताळी मुंबईच्या बाजारपेठेत
आंबा ः शाहूवाडीची रताळी मुंबईच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. रताळीच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल होते. दसरा सणासाठी रताळीला मागणी असते. तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात रताळी काढणीस वेग आला आहे. ही रताळी मुंबई, वाशी, ठाणे व पुणे या भागात ट्रक व टेम्पोने जातात. चालू हंगामात सततच्या पावसामुळे रताळी पिकांची वाढ खुंटली आहे. उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली आहे. कडवी खोऱ्यातील शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. गणेशोत्सवानंतर परिसरातील शेतकरी रताळी काढणीस सुरुवात करतात. वालूर, निळे, येलूर, कडवे, करुंगळे, आळतूर, पेरीड, कोपार्डे, आरूळ, आंबर्डे, भेंडवडे, परळे निनाई, सांबू या २० किलोमीटर परिसरातील माळरानासह डोंगर उतारावर सुमारे तीन हजार एकरात रताळी लागवड केली आहे. रताळीला ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.
उदय दूध संस्थेतर्फे लाभांश वाटप
पोर्ले तर्फ ठाणे ः पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील उदय सहकारी दूध व्यावसायिक संस्थेतर्फे दसरा सणासाठी ठेवीवर ९ टक्के प्रमाणे ८ लाख ६८ हजार व शेअर्स रकमेवर १५ टक्के प्रमाणे लाभांश ८७ हजार असे एकूण ९ लाख ५५ हजार रुपयांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष महादेव शिंदे यांच्या हस्ते व उदय समूहाचे नेते परशराम खुडे यांच्या अध्यक्षतेखालील करण्यात आले. संस्थेचे दूध संकलन दैनंदिन ४००० लिटर आहे. वार्षिक उलाढाल २४ कोटी ५२ लाख ९१ हजार आहे. संस्था उत्पादकांना गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, गौरी-गणपती सणासाठी लाभांश, ठेवीवरील व्याज, संघ फरक, कपात केलेल्या ठेवी १० वर्षांनंतर परत असे रूपाने प्रत्येक सणाला पैसे परत करत आहेत. संचालक सदाशिव साळोखे, आनंदा खवरे, आनंदा चेचर, शिवाजी काशीद, भिकाजी बुचडे, राजाराम संकपाळ, रघुनाथ धनगर, धोंडिराम मोरे, अनूबाई चौगुले, अनूबाई पाटील, व्यवस्थापक विठ्ठल लोकरे आदी उपस्थित होते.
वारणा दूध संघाची बुधवारी सभा
वारणानगर : तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. २८) दुपारी २ वाजता संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर दुपारी २ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. संघातर्फे लम्पी साथ प्रतिबंधक लसीकरण मोहीम असे विविध उपक्रम राबवून वरीलप्रमाणे विविध कामे केली आहेत. दूध उत्पादक सभासद, शेतकरी हिताचे सतत निर्णय घेतले आहेत. सभेत १४ विषयासह ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा होणार आहे. तरी संघाच्या दूध उत्पादक सभासद, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले आहे.
02722
कोपार्डे ः येथे अंगणवाडीत कार्यक्रमप्रसंगी सरपंच शारदा पाटील, अश्विनी पाटील, डॉ. आशा शितोळे, संदीप कुंभार, सरदार जामदार.
कोपार्डेतील अंगणवाडीत विविध कार्यक्रम
कुडित्रे ः कोपार्डे (ता. करवीर) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करवीर २ कडील बीट सांगरूळ ३ मध्ये जायंटस् ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थ यांच्या सहयोगाने अंगणवाडी क्रमांक ९० मध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आकार उपक्रम घेऊन, साहित्य व खाऊ वाटप केला. ग्रुपच्या माजी अध्यक्षा डॉ. आशा शितोळे, स्त्री रोग तज्ञ उपस्थित होत्या. त्यांनी मार्गदर्शन केले. गरोदर माता पौष्टिक थाळी या थीमवर आधारित पाककला स्पर्धा झाल्या. सहभागी महिलांना बक्षीस वाटप केले. पर्यवेक्षिका अश्विनी पाटील यांनी प्रास्तावीक केले. संदीप कुंभार, सरपंच शारदा पाटील, उपसरपंच सरदार जामदार, प्रगती पाटील आदी उपस्थित होते. बाल विकास प्रकल्प अधिकारी स्नेहल माने यांचे मार्गदर्शन मिळाले. स्वाती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सारिका पाटील यांनी आभार मांडले.
म्हाकवेत ६०० जनावरांना लम्पी लस
म्हाकवे : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याने ६०० जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस दिली. म्हाकवे कर्नाटक सीमाभागात असल्यामने प्राधान्याने लसीकरण मोहीम राबविली. जनावरांना लसीकरण पशुधन विकास अधिकारी डॉ. सुमीत पाटील, डॉ. नामदेव पाटील, डॉ. अर्जुन चौगुले, डॉ. गजानन भोसले, डॉ. प्रवीण शेंडगे, यशवंत शेळके यांनी केले.
वडणगेत ग्रामपंचायत इमारतीचे आज लोकार्पण
वडणगे ः येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व आमदार पी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. २६) रोजी सायंकाळी ५ वाजता होत आहे. कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, बी. एच. पाटील, सदाशिव पाटील, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी अभिजित तेलवेकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सरपंच सचिन चौगले व उपसरपंच रमेश कुंभार, सदस्यांनी आली.
ठिकपुर्ली केद्रांतर्गत लम्पी लसीकरण
कसबा वाळवे ः पशुवैद्यकीय दवाखाना ठिकपुर्ली (ता. राधानगरी) अंतर्गत येणाऱ्या गावांमधून ५६० गायी आणि कालवडीना पशुधन पर्यवेक्षक डॉ. प्रमोद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लम्पी रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. आकनूर, मांगोली, ठिकपुर्ली, चक्रेश्वरवाडी आदी गावांत लम्पी रोगप्रतिबंधक लसीकरण केले. पशुधन पर्यवेक्षक डॉ. प्रमोद खोपडे यांच्यासह पशुवैद्यकीय दवाखाना ठिकपुर्लीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन मोफत लसीकरण केले. लम्पी त्वचरोगापासून जनावरांचा बचाव करण्याच्या दृष्टीने घरोघरी लिंबाची धुरी करणे, गोठ्यात आणि परिसरात माशी, डास, चिलटे यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके फवारण्याचेही आवाहन करण्यात आले. पशुवैद्यक डॉक्टर मिलिंद कोकणे, जयदीप व्हनाळकर, प्रतिराज पाटील यांचे सहकार्य मिळाले.