पोर्ले-शाळेची बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-शाळेची बातमी
पोर्ले-शाळेची बातमी

पोर्ले-शाळेची बातमी

sakal_logo
By

आनंदीबाई सरनोबत हायस्कूल
पोर्ले तर्फ ठाणे ः आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूलमध्ये एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आणि वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त परिसरातील वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकारांचा सत्कार झाला. यावेळी वृत्तपत्र विक्रेते विलास चोगुले (पोर्ले) आणि विक्रम दुबूले (आसुर्ले) तसेच सरदार चौगुले यांचा सत्कार झाला. यावेळी वृत्तपत्रांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. वृत्तपत्रे वाचन आणि ए.पी.जे कलाम यांच्या स्वप्नातील भारत विषयावर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका सीमा सांगरूळकर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होत. संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले.