पोर्ले-दालमियाला निवेदन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-दालमियाला निवेदन बातमी
पोर्ले-दालमियाला निवेदन बातमी

पोर्ले-दालमियाला निवेदन बातमी

sakal_logo
By

01348
पोर्ले तर्फ ठाणे ः येथे एस. रंगाप्रसाद यांना मागण्यांचे निवेदन देताना विक्रम पाटील, रामराव चेचर, उमेश शेलार, श्रीधर गोसावी, संग्राम पाटील व कार्यकर्ते.
------------------------
एफआरपीसह जादा दराबद्दल
‘दत्त दालमिया’ला निवेदन

पोर्ले तर्फे ठाणे, ता. १९ ः येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याला विविध मागण्यांचे निवेदन कारखाना युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, गत हंगामातील एफआरपी सोडून जादा २००रु. तसेच ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे चालूवर्षी एफआरपी अधिक ३५० रु. जादा दर द्यावा. टनेज साखरेचा दर १० रु. होता तो वाढवून १२ रु. केला आहे. तो १० रु.च ठेवावा व शेतकऱ्यांना टनेजची मोठी साखर द्यावी.’ यासह इतर मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, रामराव चेचर, उमेश शेलार यांच्या हस्ते कारखाना युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांना देण्यात आले. यावेळी रंगाप्रसाद यांनी शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून चर्चा केली. तुमच्या मागण्या मुख्य कार्यालयाला सांगून चार दिवसांत कळवतो, असे सांगितले. यावेळी कारखान्याचे श्रीधर गोसावी, संग्राम पाटील, शिवाजी पाटील, मुकुंद गुळवणी तर संघटनेचे उत्तम बोणे, किरण पाटील, वाय. एस. पाटील, दगडू गुरवळ आदींसह शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.