पोर्ले-नळयोजना मुहर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-नळयोजना मुहर्त
पोर्ले-नळयोजना मुहर्त

पोर्ले-नळयोजना मुहर्त

sakal_logo
By

01379
पोर्ले तर्फ ठाणे ः येथे नळ योजनेच्या कामाचा प्रारंभ करताना सरपंच सौ. नम्रता घाटगे. शेजारी परशराम खुडे, उपसरपंच खुडे, जीवन खवरे,अरुण पाटील, सचिन चोपडे आदी.
---------------

पोर्ले तर्फ ठाणेत
नळ योजनेचा प्रारंभ

पोर्ले तर्फ ठाणे, ता. ११ ः येथील ग्रामपंचायतीच्या नूतन पूरक पाणी योजनेच्या कामाचा प्रारंभ सरपंच सौ. नम्रता घाटगे यांच्या हस्ते व उदय समूहाचे नेते परशराम खुडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कासारी नदीवरून राबविण्यात येणाऱ्या योजनेमुळे दैनंदिन तीन लाख लिटर पाणी मिळेल. पूर्वीच्या सात लाख लिटर पाण्यात भर पडणार असल्याने दररोज पाणी मिळेल.
योजनेला साडेचार कोटी लाख खर्च अपेक्षित असून जलजीवन योजनेतून मंजुरी मिळाली. याकामी आमदार विनय कोरे व खासदार धैर्यशील माने यांचे सहकार्य झाले. आमदार कोरे यांच्या फंडातून वीस लाखांची कामे सुरू आहेत. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष अंगद शेवाळे, उपसरपंच शहाजी खुडे, सदस्य संभाजी जमदाडे, अरूण पाटील, सागर चेचर, सचिन चोपडे, जीवन खवरे, रजनी गुरव, वनिता भोपळे, संगीता बुचडे, अनुराधा पाटील, गीता चौगुले, अश्विनी काशिद, अश्विनी संकपाळसह सदस्य, सागर चेचर, बाजीराव साळोखे, सदाशिव साळोखे, सागर खवरे- पाटील, रामराव खुडे, बाजीराव घाटगे, युवराज कांबळे, संजय चावरेकर, नंदकुमार गुरव, शिवाजीराव काशीदसह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. अरूण पाटील यांनी आभार मानले.