पोर्ले-आंदोलन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-आंदोलन बातमी
पोर्ले-आंदोलन बातमी

पोर्ले-आंदोलन बातमी

sakal_logo
By

‘दत्त दालमिया’वरील
आंदोलनाचा पाचवा दिवस
कोल्हापूर, ता. ११ : पहिली उचल वाढवून मिळावी, तोडणी वाहतूक खर्चात कपात करावी व आरएसएफनुसार हिशेब देऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, या मागण्या घेऊन पाच दिवसांपासून जय शिवराय, शरद जोशी, रघुनाथ दादा, आझाद हिंद क्रांती संघटना दत्त दालमिया शुगर आसुर्ले पोर्ले कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत.
आज सकाळी नऊपासून माजगाव फाटा येथे शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने दत्त दालमिया शुगरची ऊस वाहतूक रोखून धरली होती. वाहतूक रोखून धरल्यामुळे पन्हाळा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. आज प्रशासनाने संघटनांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; पण तोडगा निघाला नाही. यावेळी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने, शरद जोशीप्रणित संघटनेचे अशोकराव जाधव, ज्ञानदेव पाटील, गुणाजी शेलार, आझाद हिंद क्रांतीचे मुकुंद पाटील, सदाशिव कुलकर्णी यांनी चर्चेत घेतला. विविध भागातून शेतकऱ्यांनी येऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी भाग घेणार असल्याचा इशारा दिला.