पोर्ले-आंदोलन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-आंदोलन बातमी
पोर्ले-आंदोलन बातमी

पोर्ले-आंदोलन बातमी

sakal_logo
By

‘जय शिवराय’चा
तीव्र आंदोलनाचा इशारा
पोर्ले तर्फ ठाणे, ता. १४ ः दत्त दालमिया प्रशासनाने मंगळवार (ता. १५) सकाळपर्यंत निर्णय नाही घेतला तर तीव्र आंदोलनाचा इशारा जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला. श्री दत्त दालमिया साखर कारखाना, आसुर्ले पोर्ले येथे एफआरपी वाढवून द्यावी व ऊसवाहतूक खर्च कमी करावा यासह विविध मागण्यांसाठी जय शिवराय किसान संघटनेचे आठ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. यामध्ये कारखाना प्रशासन व किसान संघटनेचे पदाधिकारी यांच्यात दोन वेळा झालेली चर्चा निष्फळ ठरली. मंगळवार सकाळी दहापासून दालमिया कारखान्याच्या गेट वर तीव्र आंदोलनाचा इशारा माने यांनी दिला. यावेळी विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.