महादेव जांभळे अध्यक्षपदी

महादेव जांभळे अध्यक्षपदी

01506
महादेव जांभळे
01505
सागर शेवाळे

महादेव जांभळे अध्यक्षपदी
पोर्ले तर्फे ठाणे : पोर्ले तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथील श्री स्वामी समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव जांभळे, तर उपाध्यक्षपदी सागर शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी शहाजी चौगुले होते. सन २०२३-२४ साला करिता ही करण्यात आली असून सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा व मसाई देवी यात्रेनिमित्त मसाई देवी यात्रा गाडा मिरवणूक स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यासाठी रोख रक्कम व ट्रॉफी बक्षीस आहे. या वेळी भीमराव चौगुले, लक्ष्मण खवरे, शहाजी चौगुले, शामराव हांडे, प्रकाश धनगर, बाबासो नंदगावकर, दस्तगीर मुलाणी, दिनकर व्हरांबळे, संभाजी खुडे उपस्थित होते. लक्ष्मण खवरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com