पोर्ले-यात्रा बातमी जाहिरात होती

पोर्ले-यात्रा बातमी जाहिरात होती

90975

मसाईदेवीची यात्रा उत्साहात
पोर्ले तर्फ ठाणे, ता. २३ ः पोर्ले तर्फ ठाणे येथील जागृत ग्रामदैवत श्री मसाईदेवीची यात्रा उत्साहात झाली. गुढीपाडव्यादिवशी मुख्य दिवस असतो. दुसऱ्यादिवशी सकाळी विविध शर्यतींसह झालेल्या कुस्त्यांच्या मैदानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गावच्या उत्तरेला एक किलोमीटरवर ग्रामदैवत श्री मसाईदेवीचे मंदिर आहे. पहाटे पुजारी पिंटू गुरव व शिवाजी गुरव यांनी सिंहावर आरूढ पूजा बांधली होती. दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळीपासून गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजता काशीद, शेवाळे, चौगुले, हरिहर पाणीपुरवठा, साळोखे,खवरे-पटील, भागोजीबुवा ग्रुप व पाटील हे मानकरी आकर्षक विद्युतरोषणाई व सजवलेल्या गाड्यांची सवाद्य मिरवणूक मुख्य रस्त्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून देवीला गेले. गाडे पहाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच अनुराधा पाटील, उपसरपंच शहाजी खुडे, सदस्य संभाजी जमदाडे, अरुण पाटील, जीवन खवरे, सागर चेचर, सचिन चोपडे, महादेव पाटील, तानाजी भोपळे, युवराज कांबळे, नंदकुमार गुरव, विकास घाटगे, तानाजी चौगुले, शहाजी पाटील, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष अंगद शेवाळे, पोलिसपाटील बाजीराव इंगळे आदींसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. पन्हाळा पोलिस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता. कै.गणपती चेचर समर्थक, उदय युवा मंच व शिवसेना शाखेतर्फे दुसऱ्या दिवशी एक्का गाडी, बैलगाडी, घोडागाडी व सुट्टा घोडा शर्यतींचे आयोजन केले होते. सायंकाळी कुस्त्यांचे आयोजन केले होते. मैदानात लहान-मोठ्या ६५ हून अधिक कुस्त्या झाल्या. यात्रेनिमित्त गावात लाखोंची उलाढाल झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com