Fri, Sept 22, 2023

आसुर्लेची भैरवनाथ यात्रा उत्साहात
आसुर्लेची भैरवनाथ यात्रा उत्साहात
Published on : 24 April 2023, 12:14 pm
आसुर्लेची भैरवनाथ यात्रा उत्साहात
पोर्ले तर्फ ठाणे ः आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील जागृत ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा अक्षय तृतीयानिमित्त शनिवार व रविवारी उत्साहात झाली. पहिल्या दिवशी पहाटे देवाची वाघावर आरूढ पुजा बांधण्यात आली होती. पहाटेपासून दर्शनास गर्दी झाली होती. गावातील विविध भावकीतील आकर्षक विद्युत रोषणाई केलेले गाडे सवाद्य मिरवणुकीने देवाला गेले. गाडे पहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडी, घोडागाडी, एक्कागाडी शर्यतीचे आयोजन केले होते. सायंकाळी सहा वाजता भव्य कुस्त्यांचे मैदान झाले. यात्रेत लाखो रूपयांची उलाढाल झाली. दोन्ही दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.