Sat, Sept 23, 2023

पोर्ले-बूडून मृत्यू बातमी
पोर्ले-बूडून मृत्यू बातमी
Published on : 10 May 2023, 6:57 am
01579
...
पोर्ले येथील एकाचा नदीत बुडून मृ्त्यू
पोर्ले तर्फ ठाणे. ता.१०ः पोर्ले तर्फे ठाणे (ता पन्हाळा) येथील तानाजी बंडू जाधव (वय ३९) यांचा कासारी नदीत पोहताना पाण्यात बुडून मृ्त्यू झाला. या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (ता. ९) सकाळी तानाजी जाधव पोर्ले- माजगावच्या दरम्यानच्या कासारी नदीवर पोहायला गेले होते. पोहत असताना दम लागून घुटमळल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे.