‘काकडी‘ चे गावं, पोर्ले तर्फे ठाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘काकडी‘ चे गावं, पोर्ले तर्फे ठाणे
‘काकडी‘ चे गावं, पोर्ले तर्फे ठाणे

‘काकडी‘ चे गावं, पोर्ले तर्फे ठाणे

sakal_logo
By

लोगो बिगस्टोरी
वसंत ग. पाटील
--
01583
-
01586
काकडी तोडताना शेतकरी.


काकडीचे गाव; पोर्ले तर्फ ठाणेचे जिल्ह्यात नाव

पोर्ले तर्फ ठाणे ः आरोग्यासाठी फलदायी असलेल्या काकडी पिकाचे उत्पादन पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. यामुळे पोर्ले तर्फे ठाणे व परिसराची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. काकडीचे गाव म्हणून पोर्ले गावाला कोल्हापूर जिल्ह्यात एक नवीन ओळख आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षां पूर्वी पोर्ले गावातून कोल्हापूरला जाणाऱ्या एस टी बसलाही काकडी क्वीन म्हणून ओळखले जात होते.

जास्त मागणी
परिसरातील शेतकऱ्यांचे काकडी हे उसाबरोबर एक नगदी व हुकमी रोख पैसा मिळवून देणारे उत्पादन आहे. फक्त पोर्ले तर्फे ठाणे गावातून काकडी हंगामात (फेब्रुवारी सुरवातीपासून एप्रिलपर्यंत)दिवसाला अंदाजे चार ते पाच टन काकडी उत्पादन होऊन कोल्हापूरला घाऊक व किरकोळ विक्री साठी जाते. सरासरी एका किलोला ५०रुपये दर मिळाला तर दोन लाख पन्नास हजार रुपये दररोज उलाढाल होते. या गावातील एकंदरीत ८०टक्के शेतकरी काकडीचे आवर्जून उत्पादन घेतात. पोर्ले तर्फे ठाणे गावा बरोबर आसुर्ले, केर्ले, पडवळवाडी, उत्रेतूनही काकडीचे उत्पादन घेतले जाते. पण पोर्ले गावच्या काकडीला जास्त मागणी आहे.

आंतरपीक म्हणून लागवड
काकडीचे उत्पादन दहा पंधरा वर्षांपूर्वी मोकळ्या (माड्या)रानात पट्टा पद्धतीने लागवड केली जात होती. पण अलीकडच्या काळात परिसरातील शेतकरी ऊसात आंतरपीक म्हणून काकडीची लागवड करतात.एकवेळ उसाचा टन कमी पडला तर चालेल पण काकडी चांगली पीकली पाहिजे अशी येथील शेतकऱ्यांची भावना आहे.

बी शेतकरी स्वतःच तयार करतात
काकडी लागवडीसाठी लागणारे बी हे शेतकरी स्वतःच तयार करतात.हे बी या परिसरातील शेतकऱ्यांकडेच मिळते. काकडीचे फळ हे अगदी नाजूक आहे.त्याची तोडणी व विक्री ज्या त्या दिवशीच करावी लागते.आज तोडलेली काकडी उद्या विक्री करता येत नाही. कारण काकडी नाजूक पीक असल्यामुळे दररोज विक्री करावी लागते.

विक्रीत महिलांच मोठा सहभाग
काकडीच्या विक्रीत परिसरातील पुरुषांच्या तुलनेत महिलांच मोठा सहभाग आहे. त्यामुळे दररोजच्या काकडी विक्रीतून महिला वर्ग पावसाळ्यासाठी दररोज काहींना काही घरचा बाजार खरेदी करतात. त्यात घरातील धान्य म्हणजे ज्वारी तेल चटणीचे सर्व साहित्य धुण्याच्या व आंघोळीच्या साबणापासून अगदी मोठ्या घरच्या कपड्या पर्यंत खरेदी केली जाते.ती म्हणजे पावसाळ्यात परत बाजारात जायला नको म्हणून काकडीच्या पैशातूनच दररोज काहींना काही साहित्य खरेदी केले जाते.


इतर भाजीपाल्याचे उत्पादन
या गावातील शेतकरी दिलीप चौगुले, रंगराव चौगुले, अशोक पाटील यांना दहा गुंठे क्षेत्रात सर्व साधारणपणे २५ ते३०हजार रुपये काकडीचे उत्पादन मिळाले आहे. असे परिसरात अनेक शेतकरी काकडी उत्पादक आहेत.तेही ऊसातील आंतरपीकात काकडीच्या उत्पादनाबरोबर इतर भाजीपालासह पीक म्हणून घेतले जाते.त्यात प्रामुख्याने दोडका, भेंडी, पोकळा, मेथी, वांगी, फ्लॉवर,कोबी अशी पीकेही घेतली जातात.