
पोर्ले-स॔घटनेची बातमी
01594
पोर्ले तर्फ ठाणेः येथील सभेत बोलताना शिवाजीराव माने. शेजारी उदय पाटील, ज्ञानदेव पाटील, गोविंद घाटगे.
....
‘उसाला प्रती टन पाच हजार दर देणे शक्य’
पोर्ले तर्फे ठाणे. ता १६ : ‘उसाला प्रती टन पाच हजार दर देणे शक्य असल्याचे मत जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी पोर्ले येथे बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी शेतकरी बळवंत पाटील होते. येथील छत्रपती शाहू महाराज चौकात झालेल्या सभेत आष्टा (ता. वाळवा) येथील २३ मे रोजी होणाऱ्या ऊस दर परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. ते पुढे म्हणाले, ‘शासनाने एफआरपीचा बेस साडे आठ टक्क्यावरून साडेदहा टक्क्यांवर नेल्याने ७८० रूपये शेतकऱ्यांना कमी मिळतात. त्यावर महागाई निर्देशांक लावल्यास २१००रूपये होतात. या दोन्ही रक्कमा एकत्र केल्यास ५१०० रूपये दर शक्य आहे. म्हणूनच आम्हाला आता कोणत्याही शेतमालावर सरकारचे नियंत्रण नको, संरक्षण हवे आहे. याकरिता ‘नको एफआरपी, हवी एमआरपी’ हे अभियान आम्ही गावोगाव जाऊन राबवत आहोत.’ याप्रसंगी उदय पाटील, ज्ञानदेव पाटील, शितल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी साबळे,अमित पाटील, गुणाजी शेलार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.