Sun, October 1, 2023

आसुर्लेत सोमवारी स्वामी समर्थ मंदिर वर्धापनदिन
आसुर्लेत सोमवारी स्वामी समर्थ मंदिर वर्धापनदिन
Published on : 20 May 2023, 8:36 am
आसुर्लेत सोमवारी स्वामी समर्थ मंदिर वर्धापनदिन
पोर्ले तर्फे ठाणे : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे चैतन्य श्री स्वामी समर्थ भक्त चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे प. पू. काटकर प्रणित श्री स्वामी समर्थ मंदिर व मुर्ती प्रतिष्ठापनेचा २० वा वर्धापनदिन सोमवारी (ता. २२) होत आहे. या वर्धापनदिनानिमित्त स्वामी समर्थ मंदिरात दररोज सकाळी रुद्र आवर्तने, सायंकाळी प्रवचने, भजन व रविवारी (ता.२१) सायंकाळी स्वामी समर्थ पालखी आनंद सोहळा, तर सोमवारी सकाळी ११वा महाप्रसाद आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चैतन्य श्री स्वामी समर्थ भक्त चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले आहे.