पोर्ले-उपसरपंच निवड बातमी

पोर्ले-उपसरपंच निवड बातमी

01619
...

पोर्ले तर्फ ठाणेच्या
उपसरपंचपदी सागर चेचर

पोर्ले तर्फ ठाणेः पोर्ले तर्फ ठाणे (ता पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर सदाशिव चेचर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच अनुराधा शहाजी पाटील होत्या. मावळते उपसरपंच शहाजी खुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंचपद रिक्त होते. एकच अर्ज असल्याने सागर चेचर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, एम. एम. पाटील, जीवन खवरे, संभाजी जमदाडे, सचिन चोपडे, गीता चौगुले, रजनी गुरव, वनिता भोपळे, नम्रता घाटगे, छाया कांबळे, अरुण पाटील, अश्विनी काशिद, अश्विनी संकपाळ, संगीता बुचडे, ग्राम विकास अधिकारी शिवाजी पाटील उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com