दै.सकाळ बातमीचा परिणाम, दिंडेवाडी बुडीत पुलाची पहाणी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दै.सकाळ बातमीचा परिणाम, दिंडेवाडी बुडीत पुलाची पहाणी.
दै.सकाळ बातमीचा परिणाम, दिंडेवाडी बुडीत पुलाची पहाणी.

दै.सकाळ बातमीचा परिणाम, दिंडेवाडी बुडीत पुलाची पहाणी.

sakal_logo
By

01596

पाण्यात बुडालेल्या रस्त्याची पाहणी
नागणवाडी प्रकल्प; अधिकाऱ्यांसमोर मांडल्या अडचणी
पिंपळगाव, ता. ३ ः भुदरगड तालुक्यातील नागणवाडी (बारवे - दिंडेवाडी) धरणाच्या पाणीसाठ्यात मुरुक्टे - दिंडेवाडी मुख्य पुल आणि रस्ता पाण्यात गेल्याचे वृत्त ‘सकाळ’ने सर्वप्रथम मांडले. आज या वृत्ताची दखल घेत शासकिय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी बुडीत पुलाची पाहणी केली.
दिंडेवाडीचे माजी सरपंच प्रा. डाॕ. शहाजीराव वारके यांनी पूल पाण्याखाली गेल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पाटबंधारे अधिकारी, बांधकाम विभागाचे आधिकाऱ्यांना सांगितल्या. पुलाचे बांधकाम करतांना वाहतूक सोईबरोबरच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची निर्मिती केल्यास वंचित मुरुक्टे, मानवळे, भांडेबांबर येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी, पाणी योजनांसाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. पूल बुडाल्यामुळे वापर सुरू आसलेल्या लांब पल्ल्याच्या रस्त्यांची पाहणी केली.
पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. के. मेंगाणे, भुदरगड पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. व्ही. कुंभार, शाखाअभियंता एन. एस. कांबळे, दिग्विजय कुंभार, पी. एच. इंगळे, माजी सरपंच प्रा. डाॕ. शहाजी वारके, राजेंद्र भारमल, विद्याधर परीट, शिवाजी सावंत, निवृत्ती माने, मुख्याध्यापक यु. एस. मुळीक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ppg22b01650 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..