पुष्पनगर येथे विकासकामांचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुष्पनगर येथे विकासकामांचे उद्घाटन
पुष्पनगर येथे विकासकामांचे उद्घाटन

पुष्पनगर येथे विकासकामांचे उद्घाटन

sakal_logo
By

01728
पिंपळगाव ः ग्रामपंचायतीकडे घंटागाडी सुपूर्द करताना रोहिणी आबिटकर. यावेळी सरपंच आर. बी. देसाई, उपसरपंच राजेंद्र देसाई, शिवाजीराव चोरगे, सुरेश देसाई आदी.

पुष्पनगरला विकासकामांचा प्रारंभ, लोकार्पण
पिंपळगाव ता. ३ ः मतदारांनी सलग दोनवेळा पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व दिले. जनहिताची कामे करताना गटा-तटाचा विचार केला नाही. पुष्पनगरमध्ये कोट्यवधींची कामे केली असून यापुढेही सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी दिली.
पुष्पनगर (ता. भुदरगड) येथे आमदार आबिटकरांच्या प्रयत्नातून पूर्ण विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अर्जुन आबिटकर म्हणाले, राजकीयदृष्ट्या निवडणुका येतात जातात. परंतु गाव संघटित असेल तर विकास थांबत नाही. पुष्पनगर ग्रामपंचायत हद्दीत कोट्यावधीची विकासकामे पूर्ण झाली.’ यावेळी गोकुळचे माजी संचालक बाबा देसाई, जि.प. सदस्य रोहिणी आबिटकर, माजी सभापती सुनील निंबाळकर, सरपंच आर. बी. देसाई, उपसरपंच राजेंद्र देसाई, माजी पं.स. सदस्य जयवंत चोरगे, दिनकरराव चव्हाण, लक्ष्मण सुतार, धोंडीराम खोपडे, रणजित माडेकर, जी. बी. खांडेकर, डी. आर. शिंदे, अविनाश कालेकर, सुरेश देसाई, पांडुरंग कडव, अमोल कांबळे, नीलेश देसाई, शशिकांत गुरव, धनाजी डांगे, शिवाजी वळीवडे, संतोष शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. के. ए. देसाई यांनी प्रास्ताविक, शिवाजीराव चोरगे यांनी आभार मानले.