नागणवाडी येथे विधी सेवा समिती मार्फत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागणवाडी येथे विधी सेवा समिती मार्फत मार्गदर्शन
नागणवाडी येथे विधी सेवा समिती मार्फत मार्गदर्शन

नागणवाडी येथे विधी सेवा समिती मार्फत मार्गदर्शन

sakal_logo
By

01738

नागणवाडी ः येथे कायदेविषयक मार्गदर्शन व माहिती शिबिरात उपस्थित वकील व ग्रामस्थ.

कायदेविषयक अज्ञान दूर व्हावे
न्यायाधीश मुल्ला; नागणवाडीत मार्गदर्शन शिबिर

पिंपळगाव, ता. १२ ः कायदेविषयक चांगला सल्ला घेऊन अज्ञान दूर करा. मनमोकळेपणाने या. न्याय मिळेल, असे प्रतिपादन भुदरगडच्या दिवाणी न्यायाधीश व्ही. बी. मुल्ला यांनी आज नागणवाडीत केले. ज्येष्ठ वकील एस. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. ते नागणवाडी (ता भुदरगड) येथील विठ्ठल मंदिरात, भुदरगड तालुका विधी सेवा समितीर्फे आयोजित मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व माहिती शिबिरात बोलत होते.
यावेळी न्यायाधीश मुल्ला म्हणाले, ‘२००४ नंतर महिलांना आई-वडिलांच्या मालमत्तेत समान हिस्सा दिला. कौटुंबिक वाद किंवा अन्य माध्यमातून मोठा कायदेशीर आधार दिला.’ यावेळी ॲड. एस. बी. पाटील म्हणाले, ‘न्यायालयाच्या माध्यमातून मोफत कायदेविषयक विधी, सहाय्य, सल्लाविषयक मार्गदर्शन होते. फिरते न्यायालयही चांगले माध्यम आहे.’ यावेळी प्राजक्ता लटके, प्रा. संजय खोचारे, उपसरपंच दिलीप कदम यांनी मनोगत व्यक्त केले. महेश चोपडे यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला. यावेळी सरपंच स्मिता परीट, ग्रामसेवक नारायण इंगळे, आनंदा शेवाळे, राजेंद्र साळोखे, आनंदा साळोखे, गुंडू साळवी, संभाजी कदम, गणपती साळोखे, शांताबाई सुतार, छाया आळवे, सुधाताई साळवी, मालुताई साळवी, पांडुरंग साळोखे, गणपती साळोखे, बाळू सुतार, विजय मोरबाळे, मंगल साळवी, राजश्री सुतार, सखुबाई साळोखे, अरूणा मोरबाळे, पोलिसपाटील सुजाता साळोखे, शामराव सुतार, विश्वनाथ पन्हाळकर, मारूती पाटील, बाळू साळोखे, सुधाकर साळवी, पांडुरंग साळोखे, संभाजी साळवी, मोहन शेवाळे, धोंडीराम साळोखे उपस्थित होते. अशोक साळोखे यांनी सूत्रसंचालन, सहदेव साळोखे यांनी आभार मानले.