
बामणे पाणीप्रश्न सुटला
01859
बामणेत विकासकामांचे लोकार्पण
पिंपळगाव ः बामणे (ता. भुदरगड) येथे जॅकवेल, पाईपलाईन, बोअरवेल या योजनेचा लोकार्पण सोहळा झाला. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने पूर्णत्वास निघाला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ते बामणे येथे नव्याने बांधलेल्या जॅकवेल उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘बऱ्याच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. राधानगरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पंडितराव केणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, माजी पं. स. सभापती जगदीश पाटील, भुदरगड तालुका संघाचे अध्यक्ष बाळकाका देसाई, बिद्रीचे संचालक मधूआप्पा देसाई, के. ना. पाटील, माजी संचालक सुनीलराव कांबळे, माजी सरपंच बाळ जाधव यांच्यासह बामणे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.