भुदरगड तालुक्यात वनहद्दीत वणवे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुदरगड  तालुक्यात वनहद्दीत वणवे.
भुदरगड तालुक्यात वनहद्दीत वणवे.

भुदरगड तालुक्यात वनहद्दीत वणवे.

sakal_logo
By

02112
तारेवाडी : डोंगर भागातील आगीत जळालेली काजू झाडे.


तारेवाडीत काजू बागांसह
वनसंपदा आगीत जळून खाक

नेसरी : तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील डोंगर भाग परिसरातील अनेक एकरांतील शेतकऱ्यांच्या काजू बागांना अचानक आग लागून काजू बागांसह वनसंपदा आगीत जळून खाक झाली. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले. डोंगर भागात गवे, मोर, माकडे, ससे आदी प्राणी, पक्षांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. वारंवार लागत आसलेल्या आगींमुळे वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. आठवड्यात दोन-तीन वेळा अचानक काजू बागांना आग लागण्याचे प्रकार सुरू आहेत. आगीमध्ये काजू झाडे, वनसंपदा जळून खाक होत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी काही शेतकरी काजू बागा स्वच्छ करून पाला-पाचोळा जाळतानाच अचानक भडका उडून काजू झाडे जळत असल्याचे दिसून येते. आग लागल्यानंतर शेतकऱ्यांकडून आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो, पण उन्हाचा तडाखा, पाला-पाचोळा अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळत नाही. आग लागल्याची माहिती इतर शेतकरी वर्गामध्ये समजताच गावापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर असलेल्या माळपर्यंत पोहचण्याआगोदरच अनेक काजू बागा आगीत जळून खाक होत आहेत.
---------------
00966
झापाचीवाडीः येथे शॉर्टसर्किटने जनावरांचे शेड जळाले.

झापाचीवाडीत जनावरांचे शेड जळाले

धामोड : म्हासुर्ली पैकी झापाचीवाडी (ता.राधानगरी) येथे शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत भिकाजी तुकाराम बाचणकर यांचे शेतातील जनावरांचे शेड जळाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीत लाकडी बैलगाडीसह वाळके गवत व शेती औजारे जळून खाक झाली.
म्हासुर्ली - धामोड रस्त्यालगत असलेल्या शेतात बाचणकर यांचे जनावरांचे शेड आहे. शेडजवळूनच विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. ठिणगी पडल्याने शेड आगीच्या भक्षस्थानी पडले. सुदैवाने शेडमध्ये जनावरे नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेडमध्ये ठेवलेली लाकडी बैलगाडी, जनावरांचे वाळके गवत व औजारे आगीत जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने बचाव कार्य करण्यास अडथळा निर्माण झाला.

...

बुक्किहाळमधील ‘ती’ विद्युत ओढणी हलविली

कोवाड ः बुक्किहाळ बुद्रूक ( ता.चंदगड) येथे दोन दिवसांपूर्वी विजेच्या धक्याने संतोष बच्चेनहट्टी या तरुणाचा मृत्यू झाला. ज्या विद्युत ओढणीमुळे संतोषला शेतात जीव गमवावा लागला, ती ओढणी महावितरणने रविवारी दुपारी काढून दुसरीकडे बसविली. तसेच लाईनवरील सर्व खांब व ओढण्यांच्या दुरुस्तीचे काम गतिमान केल्याची माहिती कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून लोंबकळणारे खांब व ओढणींचा प्रश्न प्रलंबित होता. या भागातील विद्युत खांब व वाहिनीची अवस्थाही धोकादायक आहे. विद्युत डिपी उघड्यावर आहेत. वीज कंपनीने याचीही दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे .
...

जोगेवाडी, जकिनपेठ अरण्यक्षेत्रात वणवा
पिंपळगावः भुदरगड तालुक्यातील जोगेवाडी, जकिनपेठ, मुरुक्टे, नागणवाडी, बामणे, दिंडेवाडी, भांडेबांबर येथील अरण्यक्षेत्रात सलग चार दिवस वणवा लागल्यामुळे शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. आग लागलेल्या वनक्षेत्राला वनपाल अमोल चव्हाण ,वनरक्षक वर्षा तोरसे, दत्तात्रय जाधव, मोहन पाळेकर यांनी तातडीने भेट दिली. हवा प्रेशर मशीनच्या सहाय्याने हे वणवे विझवले. गेले आठ दिवस आगी लागण्याचे प्रकार सुरु आहेत. नागरिकांनी वन हद्दीत आगी लावू नयेत, असे आवाहन वनपाल अमोल चव्हाण यांनी केले आहे.