प्रयाग चिखली सेवा संस्थेत सत्तारूढाचा एकतर्फी विजय. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रयाग चिखली सेवा संस्थेत सत्तारूढाचा एकतर्फी विजय.
प्रयाग चिखली सेवा संस्थेत सत्तारूढाचा एकतर्फी विजय.

प्रयाग चिखली सेवा संस्थेत सत्तारूढाचा एकतर्फी विजय.

sakal_logo
By

प्रयाग चिखली सेवा संस्थेत
सत्तारूढांचा एकतर्फी विजय

प्रयाग चिखली, ता. १० ः प्रयाग चिखली विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रघुनाथ पाटील (जी. डी.) व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील बाण संगमेश्वर पॅनेलने सर्वच्या सर्व १७ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीत ‘गोकुळ’ संचालक एस. आर.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडाला. त्यांना एकही जागावर विजय मिळवता आला नाही.
विजयी बाणसंगमेश्वर पॅनेलचे नेतृत्व रघुनाथ पाटील, पांडबा यादव, भाजपाचे पै. संभाजीराव पाटील यांनी केले. विरोधी शेतकरी पॅनेलचे नेतृत्व गोकुळ संचाल पाटील यांनी केले.
गतवेळच्या निवडणुकीत एस आर पाटील यांच्या गटामधील प्रभाकर पाटील, संभाजीराव पाटील, बाळासाहेब वरुटे हे या निवडणुकीत रघुनाथ पाटील गटाकडे आले होते. तर गतवेळी रघुनाथ पाटील गटाकडे असणारे नारायण कळके हे एस आर पाटील गटाकडे गेले होते. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला.
संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासद रद्द आणि संस्थेमध्ये झालेला अपहार बाबतचा मुद्दा न्यायालयीन पातळीवर गाजला होता. त्याचाही परिणाम निकालावर झाल्याचे स्पष्ट झाले.
निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले. नूतन संचालक ः सर्वसाधारण गट- केवलसिंग रजपूत, धनाजी चौगले, प्रभाकर पाटील, उत्तम चौगले, रामचंद्र जाधव, पुंडलिक यादव, प्रदीप पाटील, सर्जेराव शिपेकर,बाबासो पाटील- तावडे. किरण वरुटे, किशोर पाटील, केदार पाटील, अनुसूचित जाती -जमाती- दिनकर कांबळे, भटक्या विमुक्त जाती जमाती दगडूसिंग रजपूत इतर मागास वर्ग- सलीम मुजावर, महिला राखीव प्रतिनिधी- जयश्री उत्तम पाटील, काजल रोहित पाटील

Web Title: Todays Latest Marathi News Prc22b00446 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top