प्रयागचिखली येथे चोरी पस्तीस हजार लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रयागचिखली येथे चोरी पस्तीस हजार लंपास
प्रयागचिखली येथे चोरी पस्तीस हजार लंपास

प्रयागचिखली येथे चोरी पस्तीस हजार लंपास

sakal_logo
By

45395
प्रयाग चिखलीत
रात्रीत चार घरफोड्या
दोन दूध संस्था, मॉलमधून ३५ हजार पळविले
सकाळ वृत्तसेवा
प्रयाग चिखली, ता. २४ ः चोरट्यांनी गावातील धुमाकूळ घालीत चार घरफोड्या कल्या. यात जी. डी. पाटील दूध संस्थेतील पंधरा हजार, संत ज्ञानेश्वर दूध संस्थेतून सोळा हजार रोकड तर जी. डी. पाटील मॉल व पोस्ट ऑफिसमधील चार हजार अशी सुमारे ३५ हजारांची रोकड चोरट्यांनी पळविली. ही घटना बुधवारी (ता. २४) पहाटे घडली. सीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांचा वावर कैद झाला आहे. करवीर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
याबाबतची माहिती अशी, प्रयाग चिखली येथील मुख्य चौकामध्ये जी. डी. पाटील सहकारी दूध संस्था व जी. डी. पाटील मॉल आहे. मेन रोड चौकाजवळ पोस्ट ऑफिस तसेच याच इमारतीतील संत ज्ञानेश्वर सहकारी दूध संस्थेचे कार्यालय आहे. चोरट्यांनी दरवाजांची कुलपे तोडून चोरी केली. चोरट्यानी सर्वच ठिकाणच्या तिजोऱ्यां फोडून दप्तरही विस्कटले आहे. चारही ठिकाणी दरवाजांची कुलपे तोडली आहेत. चोरट्यांनी तोंडाला स्कार्फ बांधल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.

म्हणून दूध संस्था लक्ष्य

सध्या ग्रामीण भागातील दूध संस्थांच्या वतीने ठेवी आणि दूध बिल वाटपांसाठी कार्यालयात पैशाची आवक-जावक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गणपती उत्सवात काही संस्था ठेवींचे वाटप करतात. त्यामुळे चोरट्याने दूध संस्थांना लक्ष्य केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Prc22b00496 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..