टुडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २
टुडे २

टुडे २

sakal_logo
By

00649
प्रयाग चिखली ः येथील जय शिवराय तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मंगळवारी रिंगण सोहळ्यात धावणारा अश्व आणि माऊलीचा जयघोष करणारे भाविक.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत
प्रयाग चिखलीत रिंगण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
प्रयाग चिखली, ता. ६ ः येथील जय शिवराय तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माऊली अश्वाचा रिंगण सोहळा तुकाराम, ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरात अमाप उत्साहात झाला. उभे व गोल रिंगण सोहळ्याने हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
अश्व चोपदार, अक्षय परीट, रामा बुंधाले, विनायक मनगुते, विकास मगदूम या पारंपरिक अश्वारोहकांनी दोन अश्वांच्या रिंगण सोहळ्यातील पहिली सलामीची फेरी केली, तसा ‘ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम’ नामाचा गजर दुमदुमू लागला. भाविकांनी अश्वांच्या पाऊलखुणांची धूळ कपाळी लावली. टाळ-मृदुंगाच्या तालावर मानाचे अश्व धावू लागले तशी वारकरी भगव्या ध्वजाने पताका उंच केली. रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने माऊलीचे अश्व येणार म्हणून ग्रामस्थांनी घरोघरी रांगोळीचा सडा करून, फुले पसरवली होती. सोहळ्यासाठी येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी हभप शिवाजी बाबूराव पाटील यांचे सहकार्य लाभले. मंडळाचे अध्यक्ष मारुती चव्हाण, उपाध्यक्ष सर्जेराव दळवी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रिंगण सोहळ्यातील महिला अश्वाच्या आगमनापूर्वी डोक्यावर तुळस घेऊन आल्या होत्या. त्यांनी ज्ञानेश्वर माऊली तुकारामच्या गजरात रिंगणाभोवती फिरत फुगडीचा फेर धरला.


अश्वाची निवड
श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे-सरकार, अंकलीकर यांच्याकडून ज्ञानेश्वर माऊली आषाढी वारी सोहळ्यासाठी शुभ्र अश्वाची निवड केली जाते व ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीसमोर अबीर बुक्का लावल्यावर सोहळ्यासाठी निवड होते. या अश्वाचे कोणतेही प्रशिक्षण होत नाही, असे अश्वमालक सूरज शितोळे सरकार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Prc22b00503 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..